महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. १३ मे । रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर : सूर्याकडे तोंड करून नियमित सूर्य नमस्कार करा. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मुलांनीही नियमित सूर्यनमस्कार करावे. यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत होते. हाडे मजबूत होतात : सूर्य नमस्कार केल्याने हाडे मजबूत होतात. यामुळे मणक्याचे हाड मजबूत राहते. व्यायामादरम्यान ताणल्याने स्नायूही निरोगी राहतात.वजन कमी करण्यासाठी फायदेशीर : सूर्यनमस्कारामुळे वजन देखील कमी करता येते. हा व्यायाम नियमित केल्याने पोटावरची चरबी कमी होते. डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त : सूर्यनमस्कार दरम्यान वायु श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे रक्तामध्ये ऑक्सिजन व्यवस्थित पोहचतो. यामुळे शरीराला डिटॉक्स करण्यात मदत होते. ताण कमी होतो : सूर्य नमस्कार मज्जासंस्था शांत ठेवतात. यामुळे मेंदूची एकाग्रता वाढते. यामुळे ताण कमी होतो.