YouTube वर Shorts व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही देखील कमावू शकता पैसे

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । शॉर्ट व्हिडीओसाठी प्रसिद्ध असलेले Tik Tok हे अॅप बॅन झाल्यानंतर अनेक युजर्सचा हिरमोड झाला. पण अशातच युजर्सच्या मदतीसाठी इतर अॅप्स सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. टीक-टॉकसारखे फिचर्स देऊन अनेक अॅप्सनी युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पण टीक-टॉकची सर कोणालाच अद्याप येऊ शकलेले नाही.

त्याचतच आता Tik Tok ला टक्क देण्यासाठी Google च्या YouTube ने कंबर कसली आहे. टीक-टॉक गेल्य वर्षी बॅन झाल्यानंतर युट्यूबने शॉर्ट व्हिडीओ फिचर Shorts लॉन्च केले होते. ज्यामध्ये युजर्स टीक-टॉक प्रमाणे व्हिडीओ तयार करु शकतात. अशातच आता कंपनीने घोषणा केली आहे की, शॉर्ट व्हिडीओ तयार करुन युजर्स पैसेही कमावू शकतात.100 मिलियन डॉलर्स फंड गोळा करण्यास YouTube ने सुरुवात केली आहे. कंपनी यामुळे शॉर्ट व्हिडीओ क्रिएटर्सना पैसे देणार आहे. व्ह्युअरशिप आणि एगेजमेंटच्या आधारावर व्हिडीओ क्रिएटर्सना युट्यूब पैसे देणार आहे. आपल्या शॉर्ट व्हिडीओवर कंपनीने जाहिरात देण्यासही सुरुवात केली आहे.

युट्यूबने हा निर्णय जगभरात तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेलं सोशल मीडिया अॅप टीक-टॉकला मात देण्यासाठी घेतला आहे. क्रिएटर्सना पैसे देऊन तरुणांमध्ये युट्यूब Shorts लोकप्रिय करण्याचा कंपनीचा मानस आहे. जास्तीत जास्त तरुणांनी या फिचरचा वापर करावा, हाच कंपनीचा मानस आहे.

शॉर्ट्स व्हिडीओ फिचर लॉन्च करुन YouTube ने तरुणांना पर्वणीच दिली होती. अशातच आता यातून पैसे कमावण्याचा मार्ग दाखवत तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. युट्यूबने शॉर्ट व्हिडीओ फिचर वापरणे सोप केल्यामुळे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने युट्युबवर शॉर्ट व्हिडीओ तयार करता येणार आहेत. त्यामुळे युट्युबचं शॉर्ट्स टीक-टॉकला मागे टाकणार का? हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *