Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि शुभ मुहूर्त

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात. या दिवशी सोने-चांदी खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते (Know The Importance Of Akshaya Tritiya 2021 And Shubh Muhurat For Puja And Gold Purchasing).

धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचे नर-नारायण, हयाग्रीव आणि परशुरामां हे आवतार झाले होते. म्हणूनच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नारायण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी त्रेतायुगला सुरुवात झाली. असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य शुभ परिणाम देते, म्हणूनच हा दिवस अक्षय्य तृतीया आणि आखा तीज या नावांनी ओळखला जातो. यावेळी अक्षय्य तृतीया 14 एप्रिल 2021 रोजी साजरी केला जाईल. त्याचे महत्त्व, सोने आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.

शुभ मुहूर्त
? तृतीया प्रारंभ : 14 मे 2021 सकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून

? तृतीया समाप्त : 15 मे 2021 सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी

? पूजेचा शुभ मुहूर्त : पहाटे 5 वाजून 38 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *