सलमानची क्रेझ कायम ! ‘राधे…’ रिलीज होताच क्रॅश झालं Zee 5 चं सर्वर,

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानचा ‘राधे युअर मोस्ट वाँटेड भाई’ सिनेमा कधी रिलीज होतोय, याकडे त्याचे चाहते अक्षरशः डोळे लावून बसले होते. सलमानच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून निर्मात्यांनी ईदच्या मुहूर्तावर झी प्लेक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित केला आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी भाईच्या चाहत्यांनी एकाचवेळी लॉग इन केल्याने ही साईटच क्रॅश झाली! यावरून भाईचा जलवा अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ट्वीटवर तक्रारींचा पाऊस
सलमान भाईचा सिनेमा म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. त्यामुळे जगभरातील त्याचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी झी फ्लेक्सवर आले. एकाचवेळी चाहत्यांनी या ओटीटीवर लॉगइन केल्यामुळे झी प्लेक्सच सर्व्हरच क्रॅश झाला. त्यामुळे लॉगइन करूनही सिनेमा पाहता न आल्याने चाहते हैराण झाले होते. सिनेमा दिसत नसल्याने लगेचच त्यांनी ट्वीट करायला सुरुवात केली. इतकेच नाही तर काही चाहत्यांनी तर थेट सलमानलाच टॅग करत सिनेमा पाहता येत नसल्याची तक्रार केली. त्यामुळे ट्विटरवर सलमान खान आणि Zee5 हा ट्रेंड झाला.

तासाभराने साईट सुरू
एकाचवेळी मोठ्या संख्येने युझर्सने लॉग इन केल्याने झी ५ अॅप क्रॅश झाले. त्यानंतर काही वेळातच अॅपच्या टीमने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि त्यानंतर तासाभरात अॅप पुन्हा सुरू करण्यात आले. याआधी असा प्रसंग अभिनेता दिवंगत सुशांतसिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी घडला होता. हा सिनेमा हॉटस्टारवर रिलीज झाला होता. तेव्हा हॉटस्टारचं सर्व्हरही क्रॅश झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *