निवृत्ती घेतल्यानंतर या क्रिकेटपटूने पाकिस्तान देश सोडला ; IPLसाठी तयारी करतोय

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज मोहम्मद आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो लवकरच आयपीएल खेळताना दिसू शकतो. आमीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाकिस्तान देश सोडला आणि इंग्लंडमध्ये स्थायिक झाला आहे. तो तेथील नागरिकत्व घेण्याचा प्रयत्न करत आहे.आमीरला इंग्लंडचे नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतो. आमीरच्या आधी पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर अजहर महमूदने इंग्लंडची नागरिकत्व घेतल्यानंतर आयपीएल खेळला होता.

एका मुलाखतीत मोहम्मद आमीर म्हणाला, मी आता मोठ्या कालावधीसाठी इंग्लंडमध्ये राहणार आहे. मी येथे क्रिकेटचा आनंद घेत आहे आणि आणखी ६ ते ७ वर्ष खेळण्याची इच्छा आहे. गोष्टी कशा पुढे जातात हे पाहूया. माझी मुले इंग्लंडमध्येच मोठी होतील आणि येथेच शिक्षण देखील घेतील. मी येथे दिर्घ काळासाठी राहणार यात काही शंका नाही, असे तो म्हणाला.

आमीरने ब्रिटिश नागरिकत्व घेण्यासाठी अर्ज केला आहे. पाकिस्तान सोडल्यानंतर तो परदेशातील लीग स्पर्धेत खेळत आहे. जर त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले तर तो आयपीएल खेळू शकेल.आमीरने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यासाठी मिस्बाह उल हक आणि वकार युनुस यांना जबाबदार ठरवले होते. वयाच्या २८व्या वर्षी निवृत्ती घेऊन आमीरने सर्वांना धक्का दिला होता.

आयपीएल खेळणार का या प्रश्नावर आमीर म्हणाला, भविष्याबद्दल मी अद्याप विचार करत नाही. एकदा मला नागरिकत्व मिळाले तर गोष्टी बदलून जातील. संघात योग्य सम्मान दिला जात नसल्याचे आमीरने म्हटले होते. पाकिस्तानकडून क्रिकेट न खेळणे हा खुप अवघड निर्णय होता. पण दुसरा कोणताच पर्याय देखील नव्हता. आमीरने पाकिस्ताकडून ३६ कसोटीत ११९ विकेट, ६१ वनडेत ८१ तर ५० टी-२० मध्ये ५९ विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *