महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । कोरोना ची महामारी येण्यापूर्वी हॉस्पीटल मध्ये पेशंट दाखल झाल्यावर तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याच्या बरोबर किंवा जवळपास एक दोन नातेवाईकांना थांबता येत होत. त्यामूळे पेशंटने नातेवाईकाला नुसत बघीतल तरी पेशंट ला माणसीक आधार मिळत असे. डाॅक्टर तपासणीला यायचे समोरासमोर तपासत होते ,नर्स , सिस्टर समोरासमोर औषध द्यायचे , वार्डबाॅय मावशी समोरासमोर त्यांचे काम करायचे……एकंदरीत उपचाराची पारदर्शकता दिसत होती. दोन रुपये बिल इकडे तीकडे असले तरी काही वाईट वाटत नव्हते कारण कुटुंबावर माणसीक तणाव निर्माण होत नव्हता….
..परंतु कोरोणा पेशंट च्या बाबतीत सर्व उलटच घडताना दिसत आहे…..एकदा पेशंट दाखल झाला की त्याला बघण्याची भेटण्याची चोरी….जसे काही पेशंट सहीत नातेवाईकांनी काहीतरी मोठा गुन्हा च केला आहे.कोरोनाच्या उपचाराच्या माणसीक तणावामुळे लोक जास्त हैराण झाले आहेत. कोरोना बाधीत व्यक्ती बरोबर त्याचे कुटुंब उपचारा दरम्यानच्या ऐकीव बातम्यांमुळे प्रचंड माणसीक तणावात येतात…..आणि वरून पेशंट ला आयसीयु मध्ये ऑक्सिजन बेडवर दाखल केल्यावर त्याला भेटू दिले जात नाही. त्याची विचारपूस करू दिली जात नाही….पेशंट ला पुर्णपने डाॅ. व हॉस्पीटल वर सोपविले जाते. त्यानी सांगितल की फक्त ऐकायच, औषधी आणून त्यांच्या ताब्यात द्यायची व चोरासारख बाहेर गप बसायचे. आपण सर्व माणसे डाॅक्टर ला देवासमान समजतो यात कुणाच दुमत नाहीच कारण डाॅ.च्याच उपचाराने माणसाला जिवदान मिळते . परंतू शेवटी डाॅक्टर हा माणूसच आहे…म्हणजे सर्व च डाॅक्टरांना देवासमान समजने कितपत योग्य आहे.आपण आनुण दिलेली औषधी आपल्याच पेशंटला दिली जातात की नाही. प्राॅपर तज्ञ डाॅक्टर तपासायला येतात कि नाहीत. नर्स , सिस्टर व वार्डबाॅय औषधी वेळेवर देतात कि नाही, चहा नाष्टा जेवण पेशंट ला वेळेवर दिले जाते की नाही व पेशंट ची काळजी नम्रपणे घेतली जाते की नाही की हिसक बीसीसीआय केले जाते….अशा सर्व अत्यावश्यक गोष्टींपासून नातेवाईक अनभिज्ञ राहतात त्या मुळेच ते माणसीक तणावात येतात…..तेथून च चिडाचीडी होते….म्हणून कोरोना चे नियम पाळून म्हणजे नातेवाईकांना पिपीई किट व डबल मास्क घालून दिवसातून कमीत कमी दोनदा तरी पेशंट ला भेटू दिले पाहीजे , तोंडी किंवा लेखी विचारपूस करू दिली पाहीजे….पेशंट सिरीयस असेल… बोलू शकत नसेल तरी त्याला समोरासमोर बघू दिले पाहीजे…..एकंदरीत पेशंट काय अवस्थेत आहे ह्याची खातरजमा नातेवाईकांना वेळोवेळी झालीच पाहीजे…..उपचार योग्य पद्धतीने चालू असताना पेशंट गेले तरी नातेवाईक डाॅक्टरांना व हॉस्पीटलला दोष देणार नाहीत व डाॅक्टरांना देवासमान मानतील कारण उपचारात पारदर्शकता असली तर शंका येत नाहीत . एकंदरीत कोरोना बरोबर कोरोनाच्या उपचाराची भिती जनतेत राहणार नाही…..पि.के.महाजन.