Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131 रॉयल एनफिल्डने उत्पादन थांबविले - Maharashtra 24
महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे ।आरामदायी दुचाकी क्षेत्रातील कंपनी रॉयल एनफिल्डने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कारखान्यातील उत्पादन थांबविले आहे. कोरोनाच्या दुसऱया लाटेने जवळपास सर्वच उद्योगांवर परिणाम दाखविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ऑटो क्षेत्राचाही आता समावेश झाला आहे. ऑटो क्षेत्रातील रॉयल एनफिल्डनेही दुचाकी निर्मितीचे काम 16 मेपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याला वाहन विक्रीत ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नसल्याची नोंद कंपनीने केली आहे. चेन्नईमधील कंपनीच्या कारखान्याचे काम सध्या बंद ठेवण्यात आले आहे. येथे हिमालयन, क्लासिक आणि बुलेट या गाडय़ांची निर्मिती होत होती.