कोरोना इफेक्ट: 500 वर्षे जुने दुकान बंद होणार, जहाज सामग्रीची विक्री होत होती

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । कोविड-१९ च्या लॉकडाऊनने गेल्या ५०० वर्षांहून जास्त व्यवसाय करणारे लंडनमधील सर्वात जुन्या दुकानांपैकी एक आर्थर बिल जूनमध्ये बंद केले जाईल. या दुकानाला १६ व्या शतकात दोरखंड बनवणाऱ्या लॉन बर्मिंहॅमने सुरू केले होते. याचे मूळ नाव जॉन बर्मिंगहॅम हेम्प अँड फ्लेक्स ड्रेसर, टू-डीलर अँड रोप मेकर होते. हे १८४३ मध्ये सध्याच्या ठिकाणी शिफ्ट झाले. काहींच्या मते,जॉन बर्मिंगहॅमने कंपनी याच्याही आधी १५०० च्या दशकात सुरू केली. येथे क्लाइंबिंग रोपशिवाय सागरी उपकरण आणि गिर्यारोहणाची सामग्री मिळत होती. संचालकांच्या म्हणण्यानुसार, महामारीमुळे त्यांची आर्थिक स्थिती वाईट झाल्याने ते आता दुकान चालवू शकत नाहीत.

– 1791 मध्ये उघडले हे सागरी उपकरणांचे दुकान – 1843 मध्ये सध्याच्या ठिकाणी शिफ्ट झाले – 500 वर्षांपासून जुने लंडनचे दुकान बंद होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *