Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
लवकर 'स्पुटनिक लाईट'ला मंजुरी मिळण्याची शक्यता ; 'स्पुटनिक व्ही'ची दुसरी खेप भारतात दाखल, - Maharashtra 24

लवकर ‘स्पुटनिक लाईट’ला मंजुरी मिळण्याची शक्यता ; ‘स्पुटनिक व्ही’ची दुसरी खेप भारतात दाखल,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । भारतात लसीकरणाच्या मोहिमेत आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा समावेश होणार आहे. नागरिक लवकरच रशियाच्या स्पुटनिक-व्ही लस दिली जाणार आहे. आज स्पुटनिक-व्ही लसची दुसरी खेप हैदराबादला आली आहे. यापूर्वी, 1 मे रोजी लसींची पहिली खेप भारतात पोहोचली होती. 13 मे रोजी सेंट्रल ड्रग लॅबरोटरी काऊन्सिलने या लसीला मंजुरी दिली आहे. लस पुरवठा भारतीय उत्पादक भागीदारांकडून सुरू होईल.

पुढील आठवड्यापासून देशात स्पुटनिक व्ही लस देणे सुरू होऊ शकेल. जुलैपासून स्पुटनिक देशात उत्पादन सुरू करणार आहे. सध्या देशात लसीकरण मोहिमेमध्ये दोन लसी वापरल्या जात आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन वापरात आहेत. स्पुटनिक व्ही रशियाच्या गामालेया नॅशनल सेंटरने विकसित केले आहे.

रशियाचे भारतातील राजदूत निकोले कुडाशिव यांनी म्हटलं की, रशियन तज्ञांनी घोषणा केली की, कोविडच्या नव्या स्ट्रेनसाठी देखील ही लस प्रभावी आहे. या लसीची किंमत सध्या 948 रुपये प्रति डोस आणि 5 टक्के GST अशी आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) चे सीईओ किरिल्ल दमित्रीएव यांनी सांगितलं की, स्पुटनिक-व्ही ही रशिया-भारताची एक लस आहे. त्याचा मोठा भाग भारतात तयार होईल. आम्हाला आशा आहे की यावर्षी भारतात स्पुटनिक-व्हीच्या 85 कोटीहून अधिक लस तयार केल्या जातील. लवकरच भारतात स्पुटनिक-व्ही लाइट लस भारतात वापरली जाईल, अशी आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *