चीन ‘जैविक अस्त्र’ : ड्रॅगनवरच ड्रॅगनचे हे तंत्र बूमरँग झाले. 

Spread the love

महाराष्ट्र २४- वुहान शहरातील चीन लष्कराच्या जैविक प्रयोगशाळेत जैविक अस्त्रे बनविण्याचा उद्योग चीनने सुरू केला आहे. कोरोना हा मॅनमेड आहे आणि वुहानच्याच प्रयोगशाळेत कोरोनाचा हा विषाणू साकारला आणि अपघाताने म्हणा वा अन्य कारणाने चीनवर तो उलटला. ड्रॅगनवरच ड्रॅगनचे हे तंत्र बूमरँग झाले. 

इतरांसाठी खणलेल्या खड्ड्यात चीन पडला, अशी सुरुवातीला अमरिकेची तसेच युरोपियन समुदायातील बहुतांश देशांची भूमिका होती. पण, नंतर बदललेल्या परिस्थितीत कोरोनाने चीनच्या सीमा ओलांडून जगभरातील 29 वर देशांत प्रवेश केल्याने ते जागतिक आरोग्य संकट बनले. अमेरिकेतही कोरोना धडकलेला आहे. अमेरिकेसह जगाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अखेर अमेरिकेने चीनला सहकार्य करण्याची भूमिका घेतली.कोरोना विषाणूवरून आरोप-प्रत्यारोपानंतर अखेर अमेरिकाही उपचार संशोधनासाठी चीनच्या मदतीला धावली आहे. चीन राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून सांगण्यात आले की, 3,219 रुग्णांची स्थिती गंभीर असून 431 रुग्णांची स्थिती अत्यवस्थ आहे.कोरोना विषाणूवरील उपचार शोधून काढण्यासाठी आता अमेरिका चीनच्या मदतीला धावली आहे. अमेरिकेने त्यासाठी एका औषध निर्माण कंपनीसह करार केला असून संशोधन वेगात सुरू झाले आहे.कोरोनावरील उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेनेही पुढील आठवड्यात बैठक बोलावली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील चीनचा वाटा आजमितीस 16 टक्के आहे. जगभरातील व्यापार-उदिमावर कोरोनाचा प्रभाव पडलेला असून, अनेक व्यवसायांत आर्थिक कोंडीची स्थिती उद्भवली आहे

चीनमधून येणार्‍या नागरिकांचा व्हिसा रद्द :चीनमधून प्रवास करून आलेल्या कोणत्याही विदेशी नागरिकाला भारतात प्रवेश बंद करण्यात आला. ज्या विदेशी नागरिकांना यापूर्वी व्हिसा तसेच ई व्हिसा दिला असेल, तो रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूबाबतची सज्जता आणि राज्यांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिवांनी बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. आरोग्य आणि कुटुंबकल्याण, परराष्ट्र व्यवहार, नागरी हवाई वाहतूक, औषध निर्माण, गृह, वाणिज्य व संरक्षण मंत्रालयासह अन्य मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी कॅबिनेट सचिवांनी हे आदेश दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *