विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस 20 ला रत्नागिरी दौऱयावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे ।विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस 20 मे रोजी रत्नागिरी दौऱयावर वादळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते भाजप ऑक्सिजन बँक प्रोजेक्ट लोकार्पण करणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हे वादळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरीत 20 मे रोजी येत आहेत. यावेळी ते हातखंबा-मालगुंड तसेच मिरकरवाडा परिसरात वादळात नुकसान झालेल्या परिसराला भेट देणार असून भाजप व अंत्योदय प्रतिष्ठानच्या ऑक्सिजन प्रोजेक्ट लोकार्पण करणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी दिली. त्यांच्यासह आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र चव्हाण हे ही दौऱयात सहभागी असतील. भाजप व आमदार प्रसाद लाड यांनी सीएसआरमधून मदत उपलब्ध केलेल्या कोविड परकार हॉस्पिटलला देवेंद्र फडणवीस भेट देतील. यानंतर जिल्हाधिकारी यांच्यासह बैठक करतील. आंबा बागायतदारांचीही भेट घेतील. त्यानंतर राजापूरला वादळग्रस्त भागाला भेट देऊन फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *