WTC Final : न्यूझीलंडच्या या खेळाडूंना रोखण्याचे विराटसेने समोर आव्हान !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २० मे । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 (WTC Final 2021) च्या अंतिम सामना टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जून दरम्यान साऊथँम्पटन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या या खेळाडूंपासून भारताला धोका आहे.

न्यूझीलंडचा गुणी कर्णधार केन विल्यसमनकडे किवीच्या डावाची मोठी जबाबदारी असेलच पण कर्णधारपदाची देखील जबाबदारी त्याच्याकडे असणार आहे. विल्यमसनची गणना जगातील सर्वश्रेष्ठ बॅट्समनमध्ये केली जाते. त्याने WTC च्या 9 मॅचेसमध्ये 58.35 च्या सरासरीने 817 रन्स ठोकले आहेत. न्यूझीलंड WTC च्या फायनलमध्ये पोहोचायला विल्यमसनचा मोठा हात आहे. अंतिम सामन्यात त्याला खेळपट्टीवर जास्त वेळ स्थिरावू न देण्याची कामगिरी विराटसेनेला करावी लागेल. जर त्याने खेळपट्टीवर काही वेळ व्यतित केला तर त्याला रोखणं मुश्किल होऊन बसेल.

अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीचं आक्रमण ट्रेंट बोल्ट सांभाळणार आहे. बोल्टने सदासर्वदा भारतीय बोलर्सला त्याच्या स्विंगने परेशान केलंय. त्यांचे स्विंग बॉल खेळायला भारतीय बॅट्समनला अडचणी येतात. अंतिम सामन्यात भारतीय बॅट्समनना त्याच्यापासून जपून खेळावं लागेल. एकतर साऊथहॅम्पटनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे. अशावेळी बोल्टला जर खेळपट्टीने साथ दिली तर बोल्ट भारतासाठी धोकायदायक ठरु शकतो.

नील वॅनगर हा न्यूझीलंडचा ताकदीचा गोलंदाज आहे. तो त्याच्या शॉर्ट पीच बॉलसाठी ओळखला जातो. जागतिक क्रिकेटमधल्या दिग्गजांना त्याने आपल्या शॉर्ट पीच बोलिंगने परेशान केलंय. या खेळाडाने 51 कसोटी सामन्यांत न्यूझीलंडसाठी 219 विकेट्स घेतल्या आहेत. किवीजचा विकेट टेकर गोलंदाज म्हणून तो ओळखला जातो. तुफान वेगाने देखील तो बॅट्समनना बीट करतो. अशावेळी अंतिम सामन्यात वॅगनरच्या शॉर्ट बॉलपासून भारतीय बॅट्समनना जपून खेळावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *