जपानमधील हा मासा सोन्यापेक्षाही महागडा आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २० मे । जपानमध्ये एक खास प्रकारचा मासा आढळतो, तो म्हणजे उनागी. ताज्या पाण्यात राहणारा हा एक इल मासा आहे. हा इल मासा जपानमध्ये प्रचंड लोकप्रिय असल्याने तो तितकाच महागडाही आहे. 2018 मध्ये एक किलो उनागी माशाची किंमत 35 हजार डॉलर इतकी होती. म्हणजेच तत्कालीन सोन्याच्या किमतीऐवढी.

जपानमध्ये सर्वप्रथम उनागी माशांच्या पिल्‍लांना पकडले जाते. त्यानंतर त्यांना एक वर्षापर्यंत पाळले जाते. त्यानंतर त्यांची विक्री केली जाते. हजारो वर्षांपासून जपानी लोक इल मासे खातात. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास इल मासा हा जपानी लोकांचे सर्वात आवडते खाद्य होय. जपानमधील रेस्टॉरंटमध्ये वर्षाला 40 ते 50 टन इल मासे विकले जातात. उनागी हा इल मासा प्रामुख्याने पूर्व आशियामध्ये आढळत असला तरी तो इतका महागडा कसा? असा प्रश्‍न निर्माण होतो. आवश्यकतेपेक्षा जास्त मासे पकडण्यात येत असल्याने या माशांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे. 1980 च्या दशकानंतर या माशांची संख्या 75 टक्यांनी कमी झाल्याने त्यांची किंमतही प्रचंड वाढली.

इल माशांच्या पिल्‍लांना पकडून त्यांची वर्षभर योग्यरीत्या देखभाल केली जाते. या माशांना पाळण्यासाठी मोठा खर्च येतो. या माशांना गहू, सोयाबीन आणि माशांचे तेल खाऊ घातले जाते. याशिवाय एखादा मासा आजारी पडला तर सर्व माशांना धोका पोहोचतो. यामुळेच या माशांची महागड्या दराने विक्री केली जाते. यामुळे पाळणार्‍यांना पैसाही भरपूर मिळतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *