महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । WhatsApp आपल्या प्लॅटफॉर्मवर सतत नवनवीन फीचर्स जोडत असतं. या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर न्यू आर्काइव फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. आता आणखी एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपवर एक नवं फीचर येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या युजर्ससाठी एक नवं स्प्लॅश स्क्रिन फीचर रोल आउट करणार आहे.
अँड्रॉईड आणि आयओएस आधारित अॅपवर लाईट आणि डार्क स्प्लॅश स्क्रिन फीचर लाँच केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आता कंपनी या फीचरची सुविधा व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉप युजर्ससाठी रोल आउट करणार आहे. हे नवं फीचर व्हॉट्सअॅप वेब व्हर्जन 2.2119.6 अपडेटच्या रुपात उपलब्ध करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचा लोगो व्हाईट बॅकग्राउंडसह दिसेल, ज्यावेळी युजर पहिल्यांदा या सुविधेसह व्हॉट्सअॅप ओपन करेल.
व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉपच्या या फीचरशिवाय, कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवा स्टिकर पॅकही आणला आहे. या नव्या स्टिकर पॅकला ‘शेअर एशियन लव’ असं म्हटलं आहे. हा स्टिकर पॅक 1.8 MB आहे. हे अँड्रॉईड आणि आयओएस अॅपमध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध आहे.
या महिन्यात व्हॉट्सअॅपने सहा स्टिकर पॅक आणले आहेत. A Burdensome Pigeon ज्याचं नाव Eagle आहे. दुसरा पॅक डासिंग बियर Betakkuma 2 आहे. तिसरा बेस्ट फ्रेंड Egg and Chup, चौथा रिएलिस्टिक रॅबिट, पाचवा Square Cheese’s Daily Life आणि सहावा Woman Cactus असे स्टिकर पॅक आहेत.