YAAS चक्रीवादळाचा मोठा धोका, भारतीय हवामान विभागाने दिला हा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २४ मे ।आणखी एक चक्रीवादळ येत्या 24 तासात धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ मोठ्या भयंकर वादळात रुपांतरीत होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नौदल आणि वायु सेनेकडून अधिक खबरदारी घेण्यात आली आहे. या चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभागाचे (IMD)राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून (NWFC)सांगण्यात आले की, यास (YAAS) उत्तर-वायव्येकडे जात असताना, सोमवारी पहाटे ते चक्रीवादळ वादळामध्ये रूपांतरित होईल आणि येत्या 24 तासांत ते उग्ररुप धारण करु शकते. चक्रीवादळ तीव्र वादळात बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उपग्रह आणि समुद्राच्या गतीशीलतेच्या सहाय्याने घेतलेल्या छायाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर यावर भाष्य करण्यात आले आहे. ( yaas may change in cyclone today navy and air force ready )

हवामान खात्याने म्हटले आहे की, चक्रीवादळ यास (Cyclone Yaas) उत्तर-वायव्य दिशेने वाटचाल करत राहील आणि हळूहळू ते तीव्र होईल. 26 मे पर्यंत पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या सीमेजवळ उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात पोहोचेल. 26 मे रोजी संध्याकाळपर्यंत वादळ म्हणून पारादीप आणि सागर बेटांच्या दरम्यान उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल ओलांडणे अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *