Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
ही कंपनी देणार करोना मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला ६० वर्षे पगार - Maharashtra 24

ही कंपनी देणार करोना मुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला ६० वर्षे पगार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ मे । करोना महामारी मुळे देशभर विविध क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. टाटा स्टील कंपनीने कर्मचारी आणि त्याच्या परिवाराच्या सुरक्षेसाठी सामाजिक सुरक्षा स्कीमची घोषणा केली असून या योजनेची बरीच चर्चा सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत कंपनीतील कर्मचाऱ्याचा करोना मुळे मृत्यू झाला तर त्याच्या परिवाराला कंपनी ६० वर्षे पगार देणार आहे. या संदर्भात व्यवस्थापनाने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मदत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.

यात कर्मचाऱ्याला करोना मुळे मृत्यू आला तर ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत पूर्ण पगार शिवाय कुटुंबाला सर्व वैद्यकीय सवलती आणि घर सुविधा दिली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा भारतात पदवीपर्यंतचा शिक्षण खर्च कंपनी करणार आहे.

टाटा ग्रुप मधील कंपन्यां कर्मचारी हितासाठी नेहमीच ओळखल्या जातात. त्यात पहिला नंबर टाटा स्टीलचा आहे. कर्मचाऱ्यांना आठ तास काम, नफ्यावर आधारित बोनस, सोशल सिक्युरिटी, बाळंतपण रजा, कर्मचारी भविष्य निधी सुविधा चांगल्या प्रकारे लागू करणारी पहिली कंपनी टाटा स्टील आहे. त्यानंतर बाकी कंपन्यांनी तिचे अनुकरण केले आहे असे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *