32 इंची एलईडी स्मार्ट टीव्ही, अवघ्या 4999/- रुपयात ; सोबत तीन वर्षांची वॉरंटी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ मे । भारतात जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट एलईडी टीव्ही लॉन्च करण्यात आला असून हा टीव्ही सॅमी इनफॉर्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेटड (Samy Informatics Pvt. LTD) ने सादर केला आहे. Samy Android TV असे नाव या टीव्हीला देण्यात आले आहे. आजकाल ज्या किंमतीत स्मार्टफोन सुद्धा मिळणार नाही एवढ्या किंमतीत 32 इंची तोही पूर्णपणे स्मार्ट एलईडी टीव्ही विकला जाणार आहे. या स्मार्ट टीव्हीची किंमत कंपनीने फक्त 4999 रुपये ठेवली आहे. कंपनीचा दावा आहे, की यात कुठल्याही महागड्या स्मार्ट टीव्हीमध्ये असलेले सर्वच फीचर्स दिले जात आहेत. त्यामध्ये Screen Mirror आणि WiFi सह अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

हा टीव्ही 3 वर्षांत कधीही बिघडल्यास कंपनी तो मोफत दुरुस्त करून देणार आहे. अर्थातच त्यावर 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. या टीव्हीला एकदा इंटरनेट किंवा मोबाईल इंटरनेटशी जोडल्यास अगदी स्मार्टफोनप्रमाणे कुठलेही अॅप वापरता येईल. मग, तो युट्यूब असो वा एखादे स्मार्टफोन टीव्ही अॅप. आपल्याला गुगलच्या प्ले स्टोरवरून कुठलेही अॅप इंस्टॉल सुद्धा करता येणार आहे. या टीव्हीचे पार्ट भारतातच मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया मोहिमेत बनवण्यात आले आहेत.

सॅमी इनफॉर्मेटिक्स (Samy Informatics) चे संचालक अविनाश मेहता यांनी लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सांगितले, टीव्हीमध्ये वायफाय, हॉटस्पॉटसह साउंड ब्लास्टर फीचर सुद्धा मिळेल. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साउंड क्वालिटी आणखी सुधारता येईल. 2 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट टीव्हीमध्ये मिळतील. यात गेम सुद्धा खेळले जाऊ शकतात. सॅमीचे अधिकृत अॅप सुद्धा टीव्हीत आहे. आपण हे अॅप प्ले स्टोरवरून सुद्धा इंस्टॉल करू शकता. यासोबतच हा टीव्ही पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेशात ऑफलाइन सुद्धा खरेदी करता येईल. टीव्ही खरेदी करत असताना आधारकार्ड आवश्यक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *