छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या ‘रेनिसन्स स्टेट’ पुस्तकावर बंदी घाला

Spread the love

छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याबद्दल विकृत लेखक गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करावा…

छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे पिंपरी चिंचवड शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांना निवेदन

कारवाई करा अन्यथा पुस्तकाची होळी करु, शिव-शंभूप्रेमी तसेच छावा स्वराज्य सेना आक्रमक

महाराष्ट्र 24 । पिंपरी । विशेष प्रतिनीधी ।

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक  इंग्रजी भाषेत पुस्तक लिहिले आहे. मराठीतील एका अग्रगण्य दैनिकाच्या संपादकाने नसती उठाठेव करत अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे शिव-शंभू भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अशा विकृत लेखकावर तात्काळ गुन्हा दाखल करून हे पुस्तक बाजारात कुठेही दिसता कामा नये, अन्यथा या पुस्तकाची जाहीर होळी करण्यात येईल. तसेच पुस्तकाचे फक्त वितरण थांबवून चालणार नाही तर या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांना दिले आहे. संपादक, लेखक गिरीश कुबेर यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेले हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. असे असूनदेखील किंवा तसे सत्य पुरावे असून, देखील काही शिवद्रोही डोकी ही संभाजी महाराजांबाबत वारंवार चुकीचा इतिहास लिहून त्यांची प्रतिमा मलिन करू पाहत आहेत, म्हणजेच साडेतीनशे वर्षापूर्वी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे तसेच मारण्याचे कट कारस्थान करण्यात आले होते. ‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे बिनबुडाचे दावे केल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी माफी मागावी,

चुकीच्या आणि खोडसाळ लेखांमुळे वादग्रस्त ठरलेल्या गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात ही बदनामीची परंपरा कायम राखली आहे. स्वधर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत अत्यंत खोडसाळ आणि द्वेषपूर्ण माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. या माहितीला समकालिन इतिहासातील कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. थोरल्या छत्रपतींचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबाबत दिलेला हा बदनामीकारक मजकूर अत्यंत संतापजनक आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने प्रजेवर अत्याचार, जुलूम जबरदस्ती केल्याचे आरोप केले आहे. छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्यामध्ये दूरदृष्टीचा अभाव असल्याचे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्याची तुलना करुन दोघांचे व्यक्तिमत्त्व एकसारखेच असल्याचे मत मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास गोसावी यांच्यात गुरु-शिष्य संबंध जोडण्याचाही प्रकार केला आहे. बरं हा सगळा खटाटोप त्यांनी इंग्रजी भाषेत केला आहे, म्हणजे यांच्या नजरेसमोर असणारा वाचकवर्ग हा महाराष्ट्रातील मराठी भाषिक नसून इतर आहे. थोडक्यात यांना अमराठी लोकांना महाराष्ट्राच्या जडणघडणीबाबत अपप्रचार केला जात आहे.

छावा स्वराज्य सेनेच्यावतीने छत्रपती संभाजी महाराजांबाबत बदनामी करणारे लिखाण केल्याबद्दल गिरीश कुबेर यांचा व त्यांनी लिखाण करून तयार केलेल्या पुस्तकाचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच ही पुस्तके बाजारात दिसली तर त्यांची होळी करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

यावेळी पिंपरी पोलीस पिंपरी चिंचवड शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांना निवेदन देताना छावा स्वराज्य सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सौरभ सगर, पिंपरी चिंचवड शहरचे युवा अध्यक्ष अनिकेत बेळगावकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष सुशांत जाधव, विध्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष प्रतिक आलिबागकर, नीलेश शिर्के, ओमकार गाजरे, प्रथमेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
—————————————————————————————————–

‘संभाजी महाराजांच्या सैन्याने सामान्य प्रजेवर अत्याचार केले’. या विधानास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. संभाजी महाराजांनी सैन्याने कडक शिस्त पाळावी याकरिता पाठविलेली दोन पत्रे उपलब्ध आहेत. ही पत्रं कुबेरांचे दावे खोडून काढण्यासाठी पुरेसे आहेत. खोडसाळपणाचे गाठोडे असलेल्या या पुस्तकाने महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानाला अपमानित करण्याचे काम केले आहे. ठाकरे सरकारने जनभावनांची तात्काळ दखल घेऊन या पुस्तकावर बंदी घालावी.
– राम घायतिडक-पाटील, संस्थापक अध्यक्ष, छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य*

गिरीश कुबेर यांनी म्हटले आहे, ‘शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर वारसाचा प्रश्न सोडविण्यासाठी संभाजी महाराजांनी रक्तपात केला. त्यांनी सोयराबाई राणीसाहेब आणि अष्टप्रधान मंत्रीमंडळातील मंत्र्यांना ठार केले. या रक्तपातामुळे शिवाजी महाराजांनी घडवलेली कर्तबगार मंडळी नाहीशी झाली. हे सगळे आक्षेपार्ह्य लिखाण बिनबुडाचे असून हे पुस्तक बाजारात कुठेही दिसता कामा नये.
– राजेंद्र पडवळ, प्रदेशाध्यक्ष, छावा स्वराज्य सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *