Gold Loan च्या क्रेडिटमध्ये सुधारणा ; कोरोना संकटात सोन्यानं बँकांच्या कामगिरीला दिली चमक

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे । कोरोनाच्या संकटात Gold Loan बँकांसाठी संजीवनी म्हणून काम करत आहे. या संकटाच्या काळात सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झालीय, ज्याचा लोक फायदा घेत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालानुसार सोन्यावरील कर्जे जवळपास दुप्पट झालीत. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बँकांनी एकूण 60464 कोटी रुपयांचे सोन्याचे कर्ज वितरित केले, तर 2019-20 या आर्थिक वर्षात बँकांनी 26192 कोटींचे सोने कर्ज वितरित केले. (Gold shines on banks performance in Corona crisis; Gold Loan Credit Improvement)

अहवालानुसार एसबीआय आणि बंधन बँकेने दक्षिण भारतातील सोन्याच्या कर्जाच्या व्यवसायात प्रचंड तेजी नोंदविली. एसबीआयचे सोन्याचे कर्ज सहा पटींनी वाढले. त्याचे एकूण लोन बुक वाढून 20987 कोटींवर गेले. संपूर्ण आर्थिक वर्षात बँकेचे रिटेल लोन 8.7 लाख कोटी होते. यामध्ये सोन्याच्या कर्जाचा वाटा फक्त दोन टक्के आहे, परंतु ते सुरक्षित कर्ज आहे. सुरक्षित कर्ज असल्याने बँकेची पत सुधारली जाणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सीएस शेट्टी म्हणाले की, 2021-22 या आर्थिक वर्षात आणखी 10 हजार कोटींचे सोने कर्ज वितरीत केले जाईल, अशी आम्हाला आशा आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस Gold Loan 30 हजार कोटींच्या पुढे जाईल, अशी बँकेची अपेक्षा आहे. जून 2020 पासून अनलॉक केलेला टप्पा सुरू झाला, तेव्हा सोन्याच्या कर्जामध्ये तेजी पाहायला मिळाली.

खासगी बँकांविषयी बोलायचे झाल्यास 2020-21 आर्थिक वर्षात फेडरल बँकेच्या गोल्ड कर्जात सुमारे 70 टक्के वाढ झाली. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत सुमारे 8.28 टक्क्यांनी वाढ झाली. ऑगस्टमध्ये सोन्याची किंमत 2000 डॉलरच्या पुढे गेली होती. हेच कारण आहे की, लोकांनी सोन्याच्या कर्जाचा फायदा घेतला. बँकेचे कार्यकारी संचालक आशुतोष खजुरिया म्हणाले की, 2020-21 आर्थिक वर्षात झालेली तेजी सध्याच्या आर्थिक वर्षात दिसून येणार नाही. याशिवाय रिझर्व्ह बँकेने सुरक्षित कर्जात 90 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्याचा मार्ग मोकळा केलाय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *