हिंगणघाट जळीतकांड : आरोपी विकेश नगराळे न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love

महाराष्ट्र २४ – नागपूर : वर्धा जिल्ह्यामधल्या हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकेश नगराळे याची पोलीस कोठडी आज संपत आहे. पुढील तापसाकरिता आज पुन्हा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे कोर्टात गर्दी राहण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व वकिलांनी घटनेचा निषेध म्हणून विकेश नगराळेवर बहिष्कार टाकल्यामुळे त्याचं आरोपपत्र अजून पर्यंत एकाही वकिलाने घेतलेलं नाही. पोलिसांनी त्याच्याकडून घटनेवेळी वापरलेलं सर्व साहित्य जप्त केलं आहे. घटनेच्या वेळी त्याने घातलेले आणि नंतर लपवलेले कपडे आणि बूट तसंच पेट्रोलची बाटली आणि इतर साहित्याचा यात समावेश आहे. 

हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर आला आहे. प्रकृती स्थिर असली तरी नाजूक आहे. एकतर्फी प्रेमातून पीडित तरुणीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *