जगातील पाहिली करोना पेशंट होती ‘सू,’ चुकीने लिक झाली माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । करोना वटवाघुळातून नाही तर चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांनी तयार केला असे आरोप चीनवर सुरवातीपासून केले जात आहेत. चीनने हे आरोप खोटे असल्याचे वारंवार सांगायचा प्रयत्न केला आहे. मात्र एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे चीनचा खोटारडेपणा उघड झाला आहे. या अधिकाऱ्याने मेडिकल जर्नलला पाठविलेल्या कागदपत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या माहितीनुसार चीन मधून जगभर पसरलेल्या विषाणूला कोविड नाव मिळण्याच्या अगोदर तीन आठवडे वुहान मध्ये संबधित प्रयोगशाळा आणि करोना ज्या रेल्वे मार्गामुळे बाहेर पसरला त्या रेल्वे मार्गाजवळ राहणाऱ्या एका महिलेला करोनाची लागण झाली होती. ६१ वर्षीय या महिलेचे नाव सू असे असून तिच्या मध्ये करोनाचीच सर्व लक्षणे होती पण तो पर्यंत या विषाणूला कोविड नाव दिले गेले नव्हते.

कॉमन फॉरेन अफेअर्स कमिटीचे टॉम तुन्जेन्ट यांनी चीनने सत्य जगासमोर शेअर करावे असे आवाहन केले आहे. हा विषाणू संपवायचा असेल तर सत्य जगासमोर येणे आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ताज्या माहितीनुसार या विषाणूला कोविड नाव मिळण्यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये चीन मध्ये ४७ हजार जणांना या विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यातील एक होती सू नावाची महिला. तिच्यात सप्टेंबर २०१९ मध्येच करोनाची लक्षणे दिसली होती.
सोशल मीडियावर चीन सरकारची कडक नजर असते त्यामुळे या संदर्भातील डीटेल्स मिळणे अवघड आहे. पण वरील मुलाखतीचे काही स्क्रीन शॉट बाहेर आले असून त्यात महिलेचे नाव, हॉस्पिटलच्या नावाचा खुलासा झाला आहे. बाकी डीटेल्स ब्लर केले गेले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *