Gold-Silver Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी उसळी, पहा आजचे भाव

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जून । महिन्याच्या पहिल्याच दिवशी (1st June 2021) सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold, Silver Price Today) मोठी उसळी पाहायला मिळते आहे. आज सोन्याची किंमत प्रति तोळा 50000 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे तर चांदी देखील 72000 रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) मंगळवारी सोन्यासह चांदीच्या किंमती देखील वाढल्या आहेत.  

गेल्या दोन महिन्यात सोन्याच्या दरात 5000 रुपयांची वाढ पाहायला मिळते आहे. मार्च महिन्यात सोन्याचे दर 44,000 रुपये प्रति तोळापेक्षाही कमी झाले होते.

-एमसीएक्सवर आज सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर 0.20 टक्क्यांनी वाढून 49,450 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत.

-तर चांदीमध्ये 0.84 टक्क्यांच्या तेजीनंतर दर प्रति किलो 72,503 रुपयांवर पोहोचले आहेत.

-आधीच्या सत्रात सोन्यामध्ये 0.45 टक्के तर चांदीमध्ये 0.42 टक्क्यांची तेजी आली होती.

तज्ज्ञांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस हे सोन्याच्या किंमती वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते. कारण या काळात गुंतवणुकदारांचा कल सुरक्षित गुंतवणुकीकडे अधिक वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *