प्रायव्हसी पॉलिसीच्या भूमिकेवर व्हॉट्सअॅप ठाम; अटी मान्य करा, अन्यथा व्हॉट्सअॅपचा वापर करणे सोडा;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जून । युझर्सना व्हॉट्सॲपला व्यक्तिगत माहिती संकलित करण्याची परवानगी देणे बंधनकारक असणार आहे. व्हॉट्सॲप ही व्यक्तिगत माहिती तिची पॅरेंट कंपनी असलेल्या फेसबुकला देणार आहे. या माहितीचा वापर फेसबुक व्यवसाय वृद्धीसाठी करणार असून पॉलिसीचा स्वीकार न केल्यास त्यांना ठराविक कालावधीनंतर तुमच्या अकाउंटवर बंदी घालण्यात येईल.

प्रायव्हसी पॉलिसीत बदल करण्याच्या भूमिकेवरून युझर्सची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्सॲपने पुन्हा एकदा आपलेच घोडे पुढे दामटले आहे. युझर्सना पसंत असो वा नसो प्रायव्हसी पॉलिसीतील बदल त्यांना स्वीकारावेच लागतील. त्यास जे युझर्स सहमती दर्शवणार नाहीत, त्यांना त्यांचा रस्ता मोकळा असल्याचे व्हॉट्सॲपने अप्रत्यक्षरीत्या सुचवले आहे. व्हॉट्सॲपने जानेवारी महिन्यात नवीन प्रायव्हसी पॉलिसीची घोषणा केली होती. १५ मेपासून ज्याची अंमलबजावणी होणार आहे.

युझर्सचे अकाऊंट काही आठवडे सुरू राहील. कॉल्स आणि नोटिफिकेशन्स त्यांना येत राहतील. मेसेज वाचता किंवा पाठवता येणार नाहीत. युझर्सना कालांतराने व्हॉट्सॲप अकाऊंट वापरता येणार नाही. व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसी संदर्भात जनजागृती करण्यासाठी दोन आठवड्यांत कॅम्पेनिंग सुरू करणार आहे.

व्हॉट्सॲप चॅट विंडोवर युझर्सना एक छोटा बॅनर दिसेल. त्यावर धोरणात काय बदल होणार आहे आणि युझर्सची किती माहिती व्हॉट्सॲप संकलित करणार आहे, याचा तपशील दिलेला असेल. युझर्सना बॅनरवरील तपशील वाचण्यासाठी ‘टॅप टू रिव्ह्यू’ या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. धोरणातील अटी व शर्ती स्वीकारण्याची वारंवार युझर्सना आठवण करून दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *