Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131 इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीला मिळणार चालना ; बॅटरीवरील वाहनांना सवलत - Maharashtra 24
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ जून । बॅटरीवर आधारीत वाहनांवरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा विचार केंद्र सरकारने चालवला असून यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. बॅटरी ऑपरेटेड वेहीकल्स अर्थात बॅटरीवर चालणाऱया वाहनांचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा प्रस्ताव मांडला जात आहे. केंद्रीय मोटर वाहन कायदा 1989 अंतर्गत सदरचे शुल्क रद्द करण्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या पावलामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीला चालना मिळणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.