खाद्यतेल दोन वर्षात तब्बल ७७ टक्के दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । देशातील विविध भागात वेग-वेगळ्या खाद्य तेलाचा वापर केला जातो. गेल्‍या वर्षभरात सर्व खाद्य तेलांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सरकारी नोंदीनुसार, मोहरीच्या तेलाचे दर एक वर्षापूर्वी प्रतिकिलो १३० रुपये होते. आता त्‍याच तेलाचा दर १८० रुपये किलो झाले आहे. १७९ रुपये किलो असणारे शेंगदाणा तेल २०० रुपयांवर गेले आहे. किरकोळ बाजारातील तेलांच्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहेत.

खाद्य तेलाचे देशांतर्गत उत्‍पादन हे देशातील मागणी पूर्ण करण्याऐवढे पुरेसे नाही. भारतात देशांतर्गत मागणीच्या फक्‍त ४० टक्‍के इतक्‍या तेलाचे उत्‍पादन होते. देशातील मागणी आणि पुरवठ्‍यातील तफावत दूर करण्यासाठी परदेशातून ६० टक्‍के तेलाचे आयात करण्यात येते. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्‍या एक वर्षात खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली आहे. त्‍यामुळे देशातील तेलाचा दरातही वाढ झाली आहे. या विषयी सरकारने याच वर्षी लोकसभेत ही माहिती दिली होती. आंतराष्‍ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतातील खाद्य तेलाचे दर कमी असल्‍याचा दावा सरकारने केला आहे.

देशातील वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या खाद्य तेलांचा वापर आहारात केला जातो. ग्राहक व्यवहार विभाग सहा प्रकारच्या तेलाच्या दरांवर नियंत्रण ठेवते. या मध्ये शेंगदाणा, सरकी, वनस्‍पती, सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाचा समावेश आहे. गेल्‍या एक वर्षात या सर्व तेलांच्या किंमतीमध्ये २० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झालेली आहे. मे महिन्यामध्ये या सर्व सहा प्रकारच्या तेलांच्या सरासरी किरकोळ किंमती ११ वर्षातील सर्वाधिक होत्‍या. कोरोनाच्या काळात तेलाच्या किंमतीमध्ये सर्वाधिक वाढ झालेली आहे. याच काळात लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्‍यामुळे लोकांचे कमाईचे साधन बंद झाल्‍याने त्‍यांच्या राेजच्‍या गरजांवर देखील परिणाम झाला आहे.

वाढती वेतन श्रेणी आणि खाद्य संस्‍कृतीतील बदलती आवड यामुळे देशात खाद्य तेलाच्या खपात देखील मोठी वाढ झाल्‍याचे दिसून येते. ग्रामीण भागात बहुतांशी मोहरीच्या तेलाचा वापर होतो. शहरातील ग्राहकांकडून सूर्यफूल तेलाचा तसेच सोयाबीनच्या तेलाचा अधिक वापर होतो. १९९० च्या दशकात ग्रामीण भागात एक व्यक्‍ती जवळपास 0.37 किलो इतक्‍या तेलाचा वापर करत होती. शहरात हे प्रमाण 0.56 किलो होते. २००० सालाच्या सुरूवातील यामध्ये वाढ होवून ते 0.56 आणि 0.66 किलो इतके झाले. २०१० च्या दशकात यामध्ये आणखीन वाढ होत ते 0.67 आणि 0.85 किलो महिना इतके झाले.

तज्ञांच्या म्‍हणण्यानुसार, कोरोनाच्या कहरामुळे उत्‍पादक देशांकडून तेलाचा होणारा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या महामारीच्या काळातही खाद्य तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. यावर पुरवठ्यामध्ये पडलेल्‍या खंडामुळेही दर वाढले आहेत. जगभरात खराब हवामानाचाही यावर परिणाम झाला आहे.
त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिका, ब्राझीलसह अनेक देश खाद्यतेलपासून जैवइंधन तयार करण्याच्या दिशेने काम करीत आहेत. यामुळे अन्न वापरातील तेल इंधनासाठीच्या बास्‍केटकडे जात आहे. यामुळे, मागणी-पुरवठा अंतर वाढत आहे, ज्यामुळे किंमत वाढत आहे.
देशात ६० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खाद्यतेल आयात केले जाते. पाम तेलावर ३२.५ तर सोयाबीनवर ३५ टक्‍के आयात शुल्क आकारले जाते. अशा परिस्थितीत सरकार या तेलांवरील आयात शुल्क कमी करू शकते. जेणेकरुन खाद्य तेलाची किंमत कमी करता येईल. या संदर्भातील एक प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे असून त्यावर लवकरच चर्चा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *