महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून । ‘फेडरेशन इंटरनॅशनल देस इचेक्स’ (फिडे) आयोजित शालेय बुद्धिबळ पदवी स्पर्धा नुकतीच पार पडली. यामध्ये मोशी येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक केशव प्रभाकर अरगडे यांनी 70 टक्के गुण मिळवून प्राविण्य मिळवले आहे. मोशी, चिखली येथे जागतिक संघटना फिडे सेमिनार पार पडला. यामध्ये शालेय बुद्धिबळ प्रशिक्षण पदवी स्पर्धा झाली तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धा, चेसिंग स्कूल स्पर्धेतही विजेतेपद मिळविले. पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यातर्फे अरगडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याबद्दल अरगडे यांनीही आमदार बनसोडे यांचे आभार मानले.
केशव यांना बुद्धिबळ खेळण्याचे धडे त्यांच्या वडिलांकडून मिळाले. घराची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त स्पर्धा खेळू शकलो नाही. परंतु वडिलांच्या प्रेरणेने आज एक उत्तम खेळाडू आणि प्रशिक्षक बनू शकलो, अशी भावना केसव अरगडे यांनी बोलताना व्यक्त केली. राज्यस्तरीय व नॅशनल लेवलला स्पर्धा खेळलो आणि कोच म्हणून पण काम केले. शालेय अभ्यासक्रमात ४ थी पासून विध्यार्थाना चेसचे प्रशिक्षण देणे, सध्या बऱ्याच शाळांनी चेस हा विषय सुरु केला आहे, त्याचा अभ्यासक्रमात समावेश करून घेतला आहे.
यानिमित्त आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते शाल पुष्पगुछ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. मैदानी खेळासोबत बौद्धिक खेळ ही मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे, आणि बुद्धिबळ खेळल्याने मुलांच्या शालेय प्रगतीवर चांगला परिणाम होत असतो, असे मनोगत यावेळी अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.