ऑनलाईन रेशन कार्डमध्ये अपडेट करा तुमचा डिलर, हे बदल तुम्ही घरबसल्या पण करू शकता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जून ।  केंद्र सरकारने प्रत्येकाला अन्न सुरक्षा कायद्यानुसार मोफत अन्नधान्य दिलं. तसेच सामान्य परिस्थितीतही शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्य पुरवलं जातं. याआधी शिधापत्रिकाधारकांना ठरवून दिलेल्या ठिकाणाहून अन्नधान्य घ्यायला लागायचं. पण वन रेशन वन कार्ड योजनेनुसार आता कार्डधारक कोणत्याही रास्त भाव दुकानातून ठरवून दिलेलं धान्य घेऊ शकतात. मात्र यासाठी तुम्हाला तुमच्या रॅशन कार्डात आवश्यक बदल करावे लागतील. हे बदल तुम्ही घरबसल्या ऑनलाईनही करु शकता. (know how to change the name of the ration card dealer in the ration card online)

या योजनेचा फायदा घेण्यासाठी नेमका काय आणि कसा बदल करायचा याबाबत आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत.

तुम्हाला तुमचा रास्त भाव दुकानदार बदलण्यासाठी राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थलावर जावे लागेल. वेबसाईटवर गेल्यानंतर एसीएसच्या मदतीने तुम्ही शोध घेऊ शकता.

यामध्ये तुम्हाला होमपेजच्या खालील बाजूला एक पर्याय दिसेल. ज्यात राशनकार्डधारकाला स्वत: रास्त भाव दुकानदार बदलण्यासंदर्भात एक पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल. यामध्ये आवश्यक ती माहिती तुम्हाला द्यावी लागेल.

यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल. यामध्ये तुमच्या दुकानदाराच्या नावाचंही उल्लेख असेल.

नवीन दुकानदार निवडण्यासाठी ‘नवीन दुकानाची निवड’ असा पर्याय दिसेल. यामध्ये तुम्हाला अनेक दुकानदारांच्या नावांची यादी दिेसेल. यामध्ये तुम्हाला आवश्यकतेनुसार हव्या असलेल्या दुकानदाराच्या नावाची निवड करता येईल.

मात्र यासह राशन कार्डधारकांना दुकानदाराचं नाव बदलण्यामागंच कारणही द्यावं लागणार आहे. यानंतर ‘संशोधित’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर काही मिनिटांमध्ये तुम्ही केलेले बदल अपडेट होतील.

यानंतर तुम्हाला परत होम पेजवर यावे लागेल. यामध्ये आवश्यक माहिती टाकावी लागेल. यानंतर आवश्यक बदल केलेल्या बाबींची प्रिंट घेऊन कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी करावी लागेल.

ही प्रिंट तुम्हाला नव्या दुकानदाराला द्यावी लागेल. तसेच तुम्ही याची एक प्रत तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्यांकडे जमा करु शकता. शिधापत्रकधारकांना 6 महिन्यातून केवळ एकदाच दुकानदाराचे नाव बदलता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *