पेट्रोल-डिझेल सलग पाचव्या दिवशी स्वस्त

Spread the love

महाराष्ट्र २४ – मुंबई : ‘करोना व्हायरस’च्या प्रकोपाने चीनमधील कमी झालेली मागणी आणि जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सलग पाचव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. सोमवारी पेट्रोल देशभरात १३ ते १६ पैसे तर डिझेल १६ ते २० पैसे स्वस्त झाले.

मागील आठवडाभरात कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमध्ये प्रति बॅरल १० डॉलरची घसरण झाली आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपन्यांचा तेल आयातीचा खर्च कमी झाला आहे. खनिज तेलातील घसरणीने तेल कंपन्या इंधन दरात कपात करीत आहेत.

 

प्रमुख शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

शहर पेट्रोल डिझेल
पुणे ७८.६0 ६८. ९०
दिल्ली ७२.१० ६५.०७
मुंबई ७७.७६ ६८. १९
चेन्नई ७४.९० ६८.७२
बंगळुरू ७४.५५ ६७.२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *