पिंपरीत सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या,डॉक्टर पतीच्या जाचाला कंटाळून पाचव्या मजल्यावरून मारली उडी

Spread the love

पिंपरी-चिंचवड, :  पेशाने डॉक्टर असलेल्या पतीकडून सतत होणारा मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका 34 वर्षीय संगणक अभियंता महिलेने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडल्याची बाब समोर येतीय पिंपरी शहरातील चिंचवड परिसरातल्या माणिक कॉलिनीतील पुष्पांगण अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या घटनेत मेघा पाटील ह्यांचा मृत्यू झालाय.

मेघाच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारी नुसार मेघाचा पती आरोपी संतोष पाटील हा तिच्याकडे माहेरून 25 लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावत होता. शिवाय तिच्या दिसण्यावरूनही सतत तिचा मानसिक छळ करायचा ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून अखेर मेघाने आत्महत्या करण्याचं टोकाच पाऊल उचललं आणि तिचा दुर्दवी मृत्यू झाला.  दरम्यान ह्या घटने बाबत तक्रार दाखल होताच चिंचवड पोलिसांनी मेघाचा पतीसह सासू सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपी पती डॉक्टर संतोष पाटील याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *