WhatsApp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करतंय ;, केवळ याच युजर्सला होणार फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । WhatsApp आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असतं. आता व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक फीचर लाँच करणार असल्याची माहिती आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप एक फ्लॅश कॉल (Flash Call) नावाच्या फीचरचं टेस्टिंग करत आहे. ज्याचा उद्देश युजर्सच्या WhatsApp लॉगइनची सध्याची ऑथेंटिसिटी बदलून, त्यात वन टाईम पासवर्ड अर्थात OTP चा वापर केला जाऊ शकतो.

ही सुविधा ऑप्शनल असेल. परंतु Flash Call अधिक सुरक्षित पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातं आहे. WhatsApp Flash Call साठी युजर्सला आपल्या फोनच्या कॉल-लॉगपर्यंत पोहचण्यासाठी परवानगी द्यावी लागेल. त्यानंतर हे फीचर आपोआप वेरिफाय करेल, की कोणी तुमच्या WhatsApp Account चा अ‍ॅक्सेस देण्यासाठी कॉल केला आहे की नाही.

WABetaInfo रिपोर्टनुसार, या फीचरवर सध्या काम सुरू आहे. Flash Call फीचरमध्ये, कोणी तुमचं WhatsApp लॉग-इन करण्याचा प्रयत्न केला, तर युजरला त्यांचा फोन नंबर आपोआप वेरिफाय करण्याची मंजूरी द्वावी लागेल. युजर्सला आधी हे ठरवावं लागेल, की आपल्या कॉल-लॉगचा अ‍ॅक्सेस WhatsApp ला द्यायचा आहे की नाही.

हे अ‍ॅप केवळ अँड्रॉईड युजर्ससाठीच असणार असून iPhone युजर्ससाठी हे उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं आहे. Apple कडून API देण्यात येत नसल्याने, डायल आणि कॉल लिस्टमध्ये कोणत्याही अ‍ॅपला प्रवेश दिला जात नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *