महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील आरटीई प्रवेशाला शुक्रवार, 11 जूनपासून सुरुवात होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने एप्रिल महिन्यात आरटीई प्रवेशाची लॉटरी जाहीर केली होती. पालकांना 11 ते 30 जून यादरम्यान संबंधित शाळेत जाऊन पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी दिल्या आहेत. आरटीई प्रवेशाच्या लॉटरीत 67 हजार 459 पाल्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.