कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावातून काही देशांना दिलासा ; ‘हे’ देश झाले मास्क फ्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । भारतात मागील दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातलेले आहे. पण जगात असेही काही देश आहेत, ज्यांनी या महामारीवर यशस्वीरित्या मात केली आहे. हे देश स्वतःहून कोरोनामुक्त झाल्याचे अभिमानाने सांगत आहे. त्याचबरोबर या देशांमधील नागरिकांना आता मास्क वापरणे आवश्यक नसून या काही देशात नागरिक रस्त्यावर मास्कविना फिरताना दिसत आहे, तर त्यांच्या मास्क न वापरल्यास कोणताही दंड आकारला जात नाही. कोरोनाच्या जीवघेण्या प्रादुर्भावातून काही देशांना दिलासा मिळाला असून काही देशांनी स्वत: ला कोरोनामुक्त घोषित केले आहे. तसेच त्या देशात आता नागरिकांना मास्क न घालण्याचे आवाहन देखील केले आहे. त्याच देशांची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

इस्त्राइल – इस्त्राइल हा स्वत: ला कोरोनामुक्त घोषित करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. येथील सरकारने मास्क लावण्याचे निर्बंध काढून टाकले आहेत. तसेच तेथील लोकसंख्येच्या ७० टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

भूतान – भूतानमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाद्वारे कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारा हा देश आहे आणि अवघ्या दोन आठवड्यांत प्रौढ जनतेच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण करण्यात आले आहे. या देशात महामारीच्या सुरूवातीपासून केवळ एकच मृत्यू झाला आहे. भूतानाला लागूनच भारत आणि चीनची सीमा असूनही, वेळेवर योग्य निर्बंध लागू केल्यामुळे या देशात कोरोना फार काळ टिकला नाही.

न्यूझीलंड – कोरोना महामारीला न्यूझीलंड या देशाने चांगल्या प्रकारे हाताळण्यामुळे या देशाचे इतर देशांकडून कौतुक केले जात आहे. पंतप्रधान जैसिंडा अर्डर्न यांचे या राष्ट्राने आभार मानून केवळ २६ मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर सरकारच्या कृती आणि निर्णयांमुळे न्यूझीलंड आज मास्क फ्री देश बनला आहे.

चीन – सर्वप्रथम चीनमधून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असला तरी आता हा देश कोरोनामुक्त झाला आहे. हा देश मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या लसीकरणामुळे आता मास्क फ्री देश बनला आहे. चीन जगातील सर्वाधिक कोरोना प्रभावित देशांपैकी एक होता, परंतु सध्या तो पर्यटनासाठीही खुला झाला आहे. चीनमधील बहुतेक थीम पार्क, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आता पूर्णपणे उघडली आहेत.

अमेरिका – अमेरिकेत काही ठिकाणी, संपूर्ण लसीकरण करण्यात आल्यामुळे तेथील लोकांना मास्क न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राने एक मोठी घोषणा केली आहे की ज्या लोकांचे पूर्णपणे लसीकरण झाले आहे, त्यांनी एकट्याने चालणे, धावणे किंवा दुचाकी चालवताना मास्क घातले नाही तरी चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *