PM Yuva Yojana: केंद्र सरकारकडून महिन्याला ५० हजार मिळवण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । जर तुम्हाला लिखाण पसंत आहे आणि तुम्ही लेखक बनू इच्छिता तर तुमच्यासाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारने YUVA योजनेची सुरुवात केली आहे. ज्याद्वारे काही हुशार युवकांची निवड केली जाणार आहे. आणि त्यांना महिन्याला ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने या स्कीमचं लॉन्चिंग केले आहे. या माध्यमातून नवोदित लेखकांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी काय करावं लागेल? किती उमेदवारांची निवड करण्यात येईल याबाबत जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३१ जानेवारी २०२१ ला मन की बात मध्ये युवा पिढीशी संवाद साधला होता. स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्यता संग्राम, वीरतेच्या गाथा याबाद्दल लिखाण करण्याचं आवाहन केले होते.त्यानंतर शिक्षण मंत्रालयाने युवा लेखकांना प्रशिक्षित करण्यासाठी युवा पंतप्रधान योजना सुरूवात केली. ही योजना युवा आणि नवोदित लेखकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला आहे.या योजनेतंर्गत पहिल्यांदा एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल त्यानंतर यातील ७५ लेखकांची निवड होईल. युवा लेखकांना प्रसिद्ध लेखक ट्रेनिंग देतील. मेंटरशिंप दरम्यान १५ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व मॅन्यूस्क्रिप्ट्स तयार करून घेतल्या जातील त्यानंतर पब्लिश केलं जाईल.

जी काही पुस्तकं पब्लिश होतील ती १२ जानेवारी २०२२ च्या राष्ट्रीय युवक दिनानिमित्त लॉन्चिंग केले जातील. त्यानंतर ही पुस्तकं स्कीमतंर्गत नॅशनल बुक ट्रस्टकडून पब्लिश करण्यात येतील. त्याचसोबत दुसऱ्या भारतीय भाषांमध्येही त्याचे भाषांतर होईल.या योजनेत ३० पेक्षा कमी वय असलेले युवक अप्लाय करू शकतात. १ जून ते ३१ जुलै २०२१ पर्यंत www.mygov.in या माध्यमातून होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत ७५ लेखकांची निवड केली जाईल. यात अर्ज भरण्यासाठीही एक अट ठेवण्यात आली आहे.अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुस्तक लिखाणाची माहिती असणे गरजेचे आहे. उमेदवारांना ५ हजार शब्दांची एक स्क्रिप्ट लिहून जमा करावी लागेल. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२१ रोजी या स्पर्धेतील विजेत्यांची नावं घोषित केली जातील.या स्पर्धेतील ७५ विजेत्यांना पुढील सहा महिन्यांसाठी महिन्याला ५० हजार शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन पुढच्या वर्षी युवक दिनानिमित्त यांच्याकडून पुस्तक लिखाण करून ते पब्लिश केले जाईल.

 

पंतप्रधान युवा योजना २०१६ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. तत्पूर्वी भारत सरकारने स्टार्टअप इंडिया योजना आणली होती. याअंतर्गत ज्या युवकांना रोजगार करायचा असेल अशांसाठी आर्थिक मदत करण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक कल्पक आयडिया असलेल्या युवकांना व्यासपीठ प्राप्त झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *