महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० जून । सोनेखरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळते आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX Multi Commodity Exchange) 0.2 टक्क्यांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर (Gold Rates) 49,020 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याशिवाय चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीचे दर 0.5 टक्क्यांनी घसरले आहेत. यानंतर चांदी (Silver Rates) 71,507 रुपये प्रति किलो झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये 0.9 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत (Gold Rates In International Market) बोलायचे झाले तर याठिकाणी देखील सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकेत सोन्यामध्ये 1.56 डॉलरची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर 1,887.09 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. चांदीचे दर 0.09 टक्क्यांच्या घसरणीनंतर 27.72 डॉलरच्या स्तरावर आहेत. याशिवाय प्लॅटिनममध्ये 0.2 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर दर 1,147.56 डॉलर झाले आहेत.
24 कॅरेट सोन्याचा भाव
गुड्स रिटर्न वेबसाइटनुसार 10 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीमध्ये 52420 रुपये प्रति तोळा आहे. कोलकातामध्ये हा दर 50920 रुपये, मुंबईमध्ये 48680 रुपये आणि चेन्नईमध्ये 50500 रुपये प्रति तोळा आहे.