खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जून । शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून त्यानुसार सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आज (बुधवार) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. ते म्हणाले, भातावरील एमएसपीमध्ये ७२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर १८६८ रुपये प्रतिक्विंटल भात आता १९४० प्रतिक्विंटल झाला आहे.

त्याचबरोबर बाजरीवरील देखील एमएसपी वाढवण्यात आली. बाजरी प्रतिक्विंटल २१५० रुपयांवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल झाली आहे. तर त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला ३०० रुपये प्रतिक्विंटल तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्वाधिक वाढ तीळाला देण्यात आली. तिळाचे भाव ४५२ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले.

कृषिमंत्री म्हणाले, केंद्र सरकारने गेल्या ७ वर्षात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल. २०१८ पासून किंमतीवर ५०% परतावा जोडून एमएसपी घोषित केली जात आहे. तोमर म्हणाले की, केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गतवर्षीच्या तुलनेत भाताचा किमान आधारभूत दर ७२ रुपये वाढून १९४० रुपयांवर आला आहे. मागील वर्षी ही रक्कम प्रति क्विंटल १८६८ रुपये होती.

चालू खरीप हंगामासाठी (केएमएस) २०२०-२१ (६ जून २०२१ पर्यंत) गेल्या वर्षीच्या ७३६.३६ एलएमटीच्या तुलनेत एमएसपीवर ८१३.११ एलएमटीपेक्षा जास्त धान्य येथे खरेदी केले गेले. त्यामुळे १२० लाख पेक्षा अधिक शेतकर्‍यांना फायदा झाल्याचे तोमर म्हणाले.

नरेंद्र सिंह तोमर पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एकामागून एक निर्णय घेण्यात आले. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. शेती फायदेशीर ठरावी, यासाठी काम केले गेले. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसाठी एमएसपीचा निर्णय घेण्यात आला आहे. भात, बाजरी आणि तूर यांचे एमएसपी वाढविण्यात आले.

तोमर नवीन कृषी कायद्यावर म्हणाले, देशातील सर्व पक्षांना कृषी कायदा आणायचा आहे. परंतु त्यांची हिम्मत होऊ शकली नाही. भारत सरकारने ११ वेळा शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिलेले नसल्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतील, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *