महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ ऑक्टोबर | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. केंद्र सरकारने २०२५ च्या सुरुवातीला आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती. मात्र, आता हा वेतन आयोग लागू होण्यास अजून उशिर होणार आहे, असं सांगण्यात येत आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला तरीही अजून आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना, संदर्भांच्या अटी समोर आल्या नाहीत. याचसोबत समिती स्थापन झालेली नाही.
आठवा वेतन आयोग लागू करण्याआधी समिती स्थापन केली जाते. ही समिती आधी रिसर्च करते. त्यानंतर हा निर्णय लागू केला जातो. दरम्यान, अजून अशी कोणतीही समिती स्थापन झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
२०२८ मध्ये लागू होणार आठवा वेतन आयोग
आठवा वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यापासून ते लागू करण्यासाठी जवळपास २ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो. दरम्यान, अजून कोणतीही प्रोसेस झालेली नाही. त्यामुळे आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून खूप वेळ लागेल. दरम्यान, २०२८ मध्ये आठवा वेतन लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
७वा वेतन आयोगाबाबत २०१४ मध्ये घोषणा झाली होती. त्यानंतर लगेचच २०१४ मध्ये याची ToR निश्चित झाली. यानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये याची रिपोर्ट समोर आली. त्यानंतर २०१६ मध्ये शिफारसी मंजूर झाल्या. त्यानंतर १ जानेवारी २०१६ मध्ये ७वा वेतन आयोग लागू झाला.यानंतर समिती स्थापन करण्यापासून ते वेतन आयोग लागू होण्यापर्यंत जवळपास ३३ महिने म्हणजे २ वर्ष ९ महिने कालावधी लागला. त्यामुळे यावेळीदेखील तेवढाच वेळ लागण्याची शक्यता आहे.