महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३ ऑक्टोबर | लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ते उशिरा येत आहेत. अजूनही सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाहीये. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा होत आहे. दरम्यान, आता यावर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत आहेत. दर महिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी कोट्यवधींचा निधी लागतो. यामुळे अनेक आमदारांचेही निधी थकले, असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, अशातच लाडकी बहीण योजना बंद होत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता एकनाथ शिंदेंनी याबाबत माहिती दिली आहे.
काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरचं ही योजना बंद होणार का अशी भीती अनेक महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.याबाबत एकनाथ शिंदेंनी सांगितले की, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ही योजना कायम सुरु राहणार.
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय
लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य सांगितले आहे. यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. अनेक महिलांनी केवायसीदेखील केले आहे. दरम्यान, काही महिलांना केवायसी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे केवायसी होत नाहीये.