Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
राशीभविष्य : 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला ; पहा राशीभविष्य - Maharashtra 24

राशीभविष्य : ‘या’ राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला ; पहा राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून ।

मेष- आज कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आज आपल्याला ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आज आपलं मन लागणार नाही.

वृषभ- आज मन प्रसन्न राहिल. कामात यश मिळेलं. पैसे खूप खर्च होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या. आज नियोजन करून कार्य करा.

मिथुन – आज अडकलेली कर्जाची कामं सुरळीत होतील. आजचा दिवस आनंदी आणि चैतन्यमय असणार आहे अनेक दिवसांपासून अडलेली कामं आज मार्गी लागतील. . आज वैवाहिक दृष्टिकोनातून आपल्याला काही अनोख्या भेटवस्तू मिळू शकतात.

कर्क- आज आपल्याला तणावाचा सामना करावा लागेल. काम आणि घर दोन्हीमध्ये कसरत होईल. पैसे साठवण्यावर अधिक भर द्यायला हवा. आज कुटुंबियांना आनंदाची बातमी मिळेल.

सिंह- आज आपल्या राशीचे ग्रह चांगले नाहीत त्याचा परिणाम होऊ शकतो. आपला आजार बरा होऊ शकतो. पैसे आणि आपल्याकडे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आज खूप जपून ठेवा. कौटुंबिक बाबींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. नियोजन करून कार्य करा.

कन्या-आज पैसे खूप खर्च होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या. करमणुकीसोबत खेळाचा समावेश केला तर दिवस उत्तम जाईल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. अनेक काळापासून उद्भवत असलेली समस्या आज सोडवा.

तुळ- आज दिवस चांगला जाईल . ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय कुठेही गुंतवणूक करू नका. सकारात्मक विचार करा. आज खूप कसरत करावी लागू शकते.

वृश्चिक- आज आपल्या दृढ आत्मविश्वासामुळे काम सोपं होईल. विश्रांती घेण्यासाठी आज वेळ मिळेल. आजची संध्याकाळ मित्र-मैत्रिणींसोबत जाईल.

धनु- आज आपल्याला ताण येऊ शकतो. कर्जाची परतफेड आजच करा. वाद आणि टीकेचा सामना करावा लागेल.आज तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील.

मकर- आज जुना आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. आज खर्चावर नियंत्रण न राहिल्यानं बजेट कोलमडेल.चांगल्या गोष्टी स्वीकारण्याकडे आज आपला कल असेल.

कुंभ- आज आर्थिक चणचण जाणवू शकते. मित्रांकडून योग्य सल्ला मिळेल. मानसिक ताण आणि कटकटीपासून दूर राहा. नव्यानं प्रेमात पडण्याची सवय धोक्याची ठरू शकते.

मीन- आज आपल्याला ताण तणावाचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी आज आपलं मन लागणार नाही. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *