महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । चीनने पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे. भारतात चीनी नागरिकांनी एक सायबर आर्मी तयार केली आहे. जी भारतीय नागरिकांच्या थेट घरात प्रवेश करणार आहे. ही सायबर आर्मी मोबाइल डाटा चोरणार आहे. एवढंच नव्हे तर मेहनतीने कमावलेल्या रक्कमेवरही चीन आर्मीचा डोळा आहे. यामुळे आता प्रत्येक भारतीय नागरिकाने सावधान राहणं गरजेचं आहे.
चीनने चक्क लॉकडाऊनच्या काळात घरात असलेल्या लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनमध्ये बसलेल्या 5 ते 6 नागरिकांना पावर बँक, लाइटनिंग पावर बँक, सन फॅक्ट्री, इजी प्लान, पॉकेट वॉलेट नावाचे पाच चीनी ऍप तयार केले आहेत. याला यूट्यूब, टेलीग्रममधून डाऊनलोड करून पैसे 24 दिवसात दुप्पट करण्याची ऑफर लोकांना दिली आहे. आपल्या या हा प्लान करण्यासाठी भारतीय लोकांना लुबाडण्याचा चीनचा प्लान आहे.
दिल्ली सायबर सेलचे डीसीपी अनियेश रॉय यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्हाला सोशल मीडियावर लोकप्रिय होणाऱ्या काही ऍपवर शंका आली. जेव्हा त्याबाबत माहिती मिळवली तेव्हा आम्हाला धक्काच बसला. यानंतर या ऍपशी संबंधित असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली. हे सगळे लोक चीन नागरिकांच्या सांगण्यावरून काम करत होते.’
‘धक्कादायक बाब समोर आली की, चीनच्या सांगण्यावरून अकाऊंट ओपन केलं जातं होतं. तसेच कंपनी देखील उघडली गेली. तसेच सायबर सेलला या प्रकरणाबद्दल धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. या लोकांनी यूट्यूब आणि टेलीग्राम चॅनलवर वेगवेगळ्या लोकांना भर्ती केलं होतं.’