कोरोना व्हायरस : भारतासाठी पहिली गुड न्यूज!

Spread the love

महाराष्ट्र २४ – जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. चीनला कोरोनाने अक्षरशः वेढा घातला असून आतापर्यंत ८०० हून अधिक बळी गेले आहेत. भारतामध्ये त्यातही केरळमध्येच तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.

कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह सध्या केरळमधील थ्रिस्सूर वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र विभागात दाखल आहे. त्या ठिकाणी तिची परिस्थिती सुधारत असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.नमुने तपासण्यासाठी अलाप्पुझा येथील इन्सिट्युट ऑफ व्हायरालॉजीमध्ये पाठवण्यात आले. ते नमूने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका टळल्याचे हे संकेत आहेत. तेच नमूने पुण्यातील नॅशनल इन्सिट्युट ऑफ व्हायरालॉजीमध्ये द्वितीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे सर्व आरोग्य विभागाच्या प्रोटोकॉलनुसार करण्यात येत आहे. त्या रुग्णाचा तिसरा नमूना निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी चीनमधील वुहान प्रांतातून केरळमध्ये परतला होता. इतर दोन पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. त्यांना अनुक्रमे कासरागॉड आणि अलाप्पुझा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिन्ही रुग्णांनी एकत्रित प्रवास केला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळमधील ३ हजार २१८ जण अजूनही निरीक्षणाखाली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *