महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । शुक्रवारी बाजार बंद होताना चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळाली तर सोन्याच्या भावात 120 रुपयांची घसरण झाली आहे. आज शनिवारी, मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,760 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,400 रुपये इतका आहे.
गेल्या 10 दिवसांचा विचार सोन्याचे भाव हे किरकोळ स्वरुपातत बदलत आहेत. 2 जून रोजी सोन्याचा भाव हा 49,230 रुपये इतका होता. . त्यानंतर सोन्याच्या भावात कमी अधिक चढ-उतार पहायला मिळाली. 10 जून रोजी सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ झाली तर 11 जून रोजी 120 रुपयांची घसरण झाली.
शुक्रवारी चांदीचा दर हा 71,400 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 1000 रुपयांची वाढ झाली असून ती किंमत 72,400 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 2 जून रोजी चांदीचा भाव हा 71,900 रुपये इतका होता. नंतर त्यामध्ये कमी अधिक चढ उतार होत राहिली. शुक्रवारी चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ झाली.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास नऊ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.