स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षापर्यंत पुन्हा निश्चित होईल “युवा’ शब्दाची व्याख्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जून । अनेक प्रकरणांत किमान वय काय असावे, याचा आगामी काळात निर्णय घेण्याची तयारी सरकारने चालवली आहे. त्यामुळे तरुण लोकसंख्येसाठी वयाचे नवे निकष असतील. मुली-मुलांच्या विवाहाचे वय सारखे असेल. सिगारेट-तंबाखू सेवनाचे किमान वय वाढेल. मद्यपानासाठी देशभर वयाची अट एकसारखीच असावी यासाठी केंद्र व राज्यांचे निर्णय कायदेशीर अधिकारात आणले जातील. इंटरनेटवर सर्फिंगसाठीही मुलांचे वय निश्चित केले जाईल.

डेटा प्रोटेक्शन विधेयकावर संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालास अंतिम रूप दिले जात आहे. इंटरनेट सर्फिंगसारठी लहान मुले कुणाला मानायचे हे यात ठरेल. इतर अनेक प्रकरणांत मुलांची व्याख्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले अशी आहे. मात्र, अमेरिका व युरोपातील अनेक देशांत १३ वर्षांवरील मुलांना सज्ञान मानले गेले आहे. भारतात सोशल मीडिया कंपन्यांनीही संसदीय समितीसमोर हाच तर्क मांडला होता.

सध्या प्रत्येक गोष्टीसाठी वयाचा वेगळा निकष
धूम्रपान18
मद्यपान18-25 नेट सर्फिंग18
ड्रायव्हिंग18
मतदान18
सैन्य भरती16.5
करभरणा18

निवडणूक, पदांसाठी वेगळे वय
पंचायत 18
लोस-विस 25
राज्यसभा 30
पंतप्रधान 25
राष्ट्रपती 35

धूम्रपानासाठी वय २१ करण्याचा मसुदा तयार
धूम्रपान आणि तंबाखू सेवनासाठी वय १८ वरून २१ करण्यासाठी विधेयकाचा मसुदा तयार आहे. विमानतळ, रेस्टॉरंटमध्ये स्मोकिंग चेंबर्सची व्यवस्थाही आता राहणार नाही.

मद्यपानाबाबत केंद्राला कायदा बदलावा लागेल
मद्यपानासाठी किमान वय निश्चित करण्याचे अधिकार राज्यांकडे आहेत. किमान वय २५ करण्यासाठी दबाव आहे. यासाठी समवर्ती सूचीत बदल गरजेचा.

विवाहाचे वय बदलणार
विवाहाचे किमान वय आता मुली व मुलांसाठी २१ वर्षे करण्यासंबंधी कृती दलाच्या अहवालावर नीती आयोगाच्या दोन बैठका झाल्या आहेत. याची घोषणा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून करू शकतात. गेल्या वेळी पंतप्रधानांनी या वयामध्ये बदल करण्याचा विचार करू, अशी घोषणा केली होती.

विवाहाच्या वयाशी मतदान जोडण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोट्यवधी वंचित राहतील.
विवाहाचे वय मुलींसाठी १८ वर्षे, मुलांसाठी २१ वर्षे आहे. सहमतीने यौन संबंधांचे वय दोघांसाठी १८ आहे.
लोकसभेत २५-३० वयाचे ५, राज्यसभेत ३०-४० वयांचे आहेत फक्त ३ सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *