अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅटट्रिक, विजयाचे श्रेय कशात?

Spread the love

महाराष्ट्र २४ ; नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचा दिल्लीत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. केजरीवाल नावाच्या एका साध्या माणसाने दिल्ली विजयाची हॅटट्रिक केली. हिरो ऑफ द डे- अर्थातच अरविंद केजरीवाल. अरविंद गोविंदराम केजरीवाल. हे काय विजय दीनानाथ चौहानसारखं भारदस्त नाव नाही.  अगदी साधं नाव. पण साधेपणात काय ताकद असते, हे केजरीवालांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं.  नेहमी पँट आणि बुशशर्ट, फार तर एखादा मफलर, या चौकटीबाहेर केजरीवाल कधीच पडले नाहीत. २०१२ मध्ये  भ्रष्टाचाराचा सफाया करण्यासाठी केजरीवाल झाडू घेऊन मैदानात उतरले.. आज ते दिल्लीचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. विकासाच्या अतिशय साध्या सोप्या सरळ मॉडेलचे नाव केजरीवाल.

केजरीवाल यांना का यश मिळाले?

१. केजरीवालांनी फक्त आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केल.

२. धर्म किंवा धर्मांमधली फूट नव्हे तर विज्ञानच देशाला पुढे नेईल, याचा पुनरुच्चार केजरीवालांनी प्रचारात अनेक वेळा केला

३. विजयाचा मार्ग फ्रीबीजमधून जातो, हे केजरीवाल जाणून होते…म्हणूनच दिल्लीत बस, मेट्रोमध्ये महिलांना सवलती सुरू केल्या.

४. भाजप खासदार प्ररवेश वर्मा यांनी केजरीवालांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला

५. त्याला प्रत्यक्ष उत्तर देणं केजरीवालांनी टाळलं

६. पण त्याचवेळी आपण हिंदूच आहोत, हा मेसेज मुलीकरवी दिला

७. भाजपनं दिल्लीत नेत्यांची फौज उतरवली असताना केजरीवालांनी घरोघरी प्रचारावर भर दिला

८. भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा नेता जाहीर करावा, याचं वारंवार आव्हान देत प्रतिस्पर्ध्याकडे नेता नाही, हेही केजरीवाल वारंवार दिल्लीकरांना दाखवून देत होते

९. दिल्लीत आंदोलनं पेटली असताना केजरीवालांनी त्यावर भाष्य करणं किंवा त्याला महत्त्व देणं कटाक्षानं टाळलं

१०. दिल्लीत ध्रुवीकरणाचे वारे असताना त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही

११. दिल्लीत आंदोलना दरम्यान गोळीबार करणारा आपचा कार्यकर्ता असेल, तर कठोर शासन केलं जाईल, अशी रोखठोक भूमिका केजरीवालांनी घेतली

१२. दिल्लीत कितीही आंदोलनं सुरू राहू देत, केजरीवालांनी  विकासाचा अजेंडा ढळू दिला नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *