महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जून । वायदा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीची चमक फिकी पडताना दिसली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे भारताच्या कमोडिटी मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर (Gold) 48,493 रुपयांपर्यंत खाली घसरला. काहीवेळानंतर हा भाव पुन्हा वर गेला. तर दुसरीकडे वायदा बाजारात (Future) चांदीच्या दरातही 0.72 टक्क्यांची हलकीशी घसरण पाहायला मिळाली. (Gold Silver prices today 15 june 2021)
सोन्याचे नवे दर
एमसीएक्स मार्केटमध्ये ऑगस्ट वायदा सोन्याचा भाव 35 रुपयांनी वधारून प्रतितोळा 48,558 इतका झाला. सोमवारी सोन्याची किंमतीत 0.8 टक्क्यांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरचा भाव वाढल्याने ही घसरण झाली.
चांदीची नवी किंमत
चांदीच्या जुलै वायद्याची किंमत 514 रुपयांनी घसरुन प्रतिकिलो 71,365 रुप ये इतकी झाली.आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीचा प्रतिऔंस भाव 0.7 टक्क्यांनी घसरुन 27.64 डॉलर्स इतका झाला.