‘ब्लेड इंडिया’कडून शिर्डी-पुणे-मुंबई शहरांसाठी हेलिकॉप्टर सेवेस प्रारंभ

Spread the love

महाराष्ट्र २४ – पुणे ; मुंढव्यातील केशवनगरमध्ये ‘ब्लेड’ने हेलिपॅड उभारले आहे. तेथून पुणे-शिर्डी आणि पुणे-मुंबई मार्गावर हेलिकॉप्टर सेवा नुकतीच सुरू करण्यात आली. मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना जुहू आणि महालक्ष्मी येथेही जाणे शक्‍य आहे. अत्याधुनिक सेवा देणारे आणि पाच आसनक्षमतेचे हेलिकॉप्टर प्रवाशांसाठी उपलब्ध झाले आहे. पुण्यातून शिर्डीसाठी ४५ मिनिटे; तसेच मुंबईसाठीही ४५ मिनिटांत हेलिकॉप्टरने प्रवाशांना पोचता येणार आहे.
कंपनीने मुंबई-शिर्डी मार्गावरही हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. तिन्ही मार्गांचे भाडे, वेळापत्रक आदींची माहिती प्रवाशांना ‘ब्लेड इंडिया’च्या वेबसाइटवर मिळेल. त्यावरच प्रवासासाठी आरक्षण करता येणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. पुणे, मुंबई, शिर्डीनंतर राज्यातील अन्य शहरांमध्ये; तसेच देशातील विविध राज्यांत हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात येणार आहे, असेही ‘ब्लेड’कडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *