Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Weather Alert IMD issue red alert for Pune Satara and Ratnagiri next thee days rain alert for all regions of Maharashtra)

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *