महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जून । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. तसंच दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी घातलेल्या निर्बंधांचा फटका अर्थव्यवस्थेलाही बसला आहे. दरम्यान दुसऱ्या लाटेमुळे चालू आर्थिक वर्षादरम्यान उत्पादनात २ लाख कोटी रूपयांचं नुकसान होऊ शकतं असा अंदाज भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) वर्तवला आहे.आर्थिक उत्पादानाच्या नुकसानीचा जीडीपी सोबत थेट संबंध असणार नाही, परंतु अर्थव्यवस्थेत पण अर्थव्यवस्थेतील मूल्यवर्धित तोट्याकडे तो निर्देशित करतो, असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे.
यापूर्वी रिझर्व्ह बँकेनं आपल्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये जीडीपीचा अंदाज कमी केला होता. तसंच सुरू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के केला होता. यापूर्वी जीडीपी वाढीचा दर हा १०.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पहिल्या तिमाहित जीडीपी १८.५ टक्क्यांच्या दरानं वाढेल या तथ्यावर प्रोजेक्शनचा अंदाज बांधण्यात आल्याचं रिझर्व बँकेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
.
दुसऱ्या लाटेचा सामना
भारतीय अर्थव्यवस्था आताही महासाथीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. परंतु आता हळूहळू पूर्वपदावर येण्याची अपेक्षादेखील आहे. दरम्यान अहवालात हे लेखकांचे विचार असून ते रिझर्व्ह बँकेचे विचारही दर्शवतात असं आवश्यक नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या पुरवठ्याशी निगडीत अनेक पैलू पूर्वीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहेत. यामध्ये कृषी आणि डिजिटल सेवांचाही समावेश आहे. हे आता यापूर्वीप्रमाणेच काम करत आहे. तर औद्योगिक उत्पादन आणि निर्यातही वाढली आहे.