विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने पकडला जोर… पश्चिम महाराष्ट्रात दमदार हजेरी…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जून । दोन-तीन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. गुरूवारी परतलेल्या पावसाने मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढलं. ठाणे, नवी मुंबई, वसई आणि पालघर येथे जोरदार सरींमुळे पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. दुपारनंतर तर नवी मुंबई, ठाणे आणि पश्चिम उपनगरांत पावसाचं रौद्ररूप बघायला मिळालं. गुरुवापासून पावसाचा जोर काय असून, शुक्रवारी सकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्येही पावसाने जोर पकडला असून, आज (१८ जून) मुंबई मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पावसाने पुन्हा दमदार पाऊल ठेवलं असून, गुरूवारी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, गुरूवारी बरसलेल्या सरींनी सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *