महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जून । अंतिम सामन्याचं मैदान मारणं ही भारतासाठी सर्वांत मोठी संधी आहे. माझ्या कर्णधार विराटसह सगळ्या संघाला शुभेच्छा आहेत. सगळ्याच खेळाडूंनी मोठ्या मेहनीतने इथपर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या मेहनतीमुळेच भारतीय संघ आज अंतिम सामना खेळतो आहे. अंतिम सामना खेळताना संघावर दबाव जरुर असेल. पण भारतीय टीमने दबाव झुगारन खेळावं. अंतिम सामन्यात जर भारताने टॉस जिंकला तर विराटने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला गांगुलीने दिला आहे.
भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा कारण विदेशात भारतीय संघाने प्रथम बॅटिंग केल्यानंतर जिंकण्याचे चान्सेस वाढतात. भारतीय संघाचं विदेशातलं रेकॉर्ड पाहिलं असता आपल्याला दिसून येईल की विदेशात भारताने प्रथम बॅटिंग केल्यानंतर सामने अधिक जिंकलेले आहेत, असंही गांगुली म्हणाला.
सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी एका मजबूत ओपनिंग भागिदारीची गरज असल्याचं सौरव गांगुलीनं सांगितलं. परदेशात खेळताना भारतीय संघाकडून सलामीवीरांची जबाबदारी महत्त्वाची असते. याआधी वीरेंद्र सेहवाग होता, जो ही कामगिरी चोख पार पाडायचा. त्यामुळे आता अनुभवी रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिलने हे शिवधनुष्य पेलणे गरजेचे असल्याचं गांगुली म्हणाला. तसंच या दोघांनी चांगला खेळ करत सुरुवात केल्यास पुढील फलंदाजानाही फलंदाजी करण सोपं जाईल असंही गांगुली म्हणाला.
भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, “भारताकडे सध्या तगडे गोलंदाज आहे. भारताचे सध्याचे गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या 20 विकेट्स घेण्याची ताकद ठेवतात. फक्त फलंदाजाना 300 ते 350 सारखे चांगले लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवण्याची गरज आहे.”