महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जून । कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट लवकरच देशात पसरू शकते. तज्ज्ञांच्या मते देशाला पुढील काही महिन्यात तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरलेली नाही. दुसऱ्या लाटेने असंख्य रुग्णांचे जीव घेतले आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. ऑक्सिजन आणि औषधांची कमतरता भासत होती. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य सुविधा वाढवण्याची तयारी केली जात आहे.
रॉयटर्स पोलने इशारा दिला आहे की, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. वाढत्या आरोग्य सुविधांमुळे दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेला सरकार चांगल्या प्रकारे नियंत्रित करू शकते.
लसीकरणामुळे कोरोना कमी होणार
जगभरातील तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात दिसून आले आहे की, लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाला आहे. तसेच भारतात ऑक्टोबर पर्यंत तिसरी लाट धडकू शकते असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.